Saturday, 5 March 2016

क्लायमॅक्स : १

 सुरुवात :

त्याच्या डोक्यात विचार घुमत होते..बस (त्याच्या भाषेत एस टी,बस नावाला तो इतका comforteble नाहीय) पळत होती, रात्र त्याच्या आजुबाजुला अंधार साचवत होती,आणि तो तंद्री लागावी म्हणुनच चौरसियांची बासरी (मोबाइल-हेडफोन इ.) ऐकत होता. खरच मस्त तंद्री लागली होती त्याची..आणि डोक्यात विचार घुमत होते...लिहायच काय? लिहिण्या सारख घडलं तर होत खरं ("खरं" अस सारख म्हणायची त्याला सवय लागलीय अलिकडं ) ...तर सांगत काय होतो, लिहिण्यासारखं कायतरी घडल होत, त्याच्या मनात आणि बाहेरपण.. त्याचा विचार चालु होता...शेवट काय करायचा, तो जे फिक्शन लिहिणार होता त्याचा? त्याच्याकड़ 3 version होती... त्यानं पाहिलं version लिहायला सुरुवात केली...

No comments:

Post a Comment